

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका तीन महिन्यांत मालामाल झाली आहे. शहरातील 34 हजार मिळकतदारांनी ऑलनाईन प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी रुपये टॅक्सपोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. 30 जूनपर्यंत ऑनलाईन टॅक्स भरणार्या 5 टक्के टॅक्समध्ये सवलतीची मुदत आहे. या योजनेचा फायदा मिळकतदारांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.
सोलापूर शहर हद्दवाढ भागात दोन लाख पन्नास हजार मिळकतदार आहेत. चालू आर्थिक वर्षाची ऑनलाईन बिले मिळकतदारांना पाठवली आहेत. मिळकतकराची आता छापील बिले देखील तयार झाली आहेत. ती बिले मिळकतदारांना वाटपास सुरुवात झाली आहे. तोपर्यंत ऑनलाईन प्रणाली, मेसेजच्या माध्यमातून बिल भरण्याच्या सूचना मिळकतदारांना केल्या होत्या. टॅक्स भरणार्या 34 हजार मिळकतदारांमध्ये 70 मिळकतदारांनी ऑनलाईन टॅक्स भरून 5 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. एका दिवसात आठशे मिळकतदारांनी दीड कोटी रूपये टॅक्सपोटी जमा केले आहेत.
दरम्यान, महापालिकेकडून मिळकतदारांना छापील बिले वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. बिल येण्याची वाट न पाहता 30 जूनपर्यंत टॅक्स भरून 5 टक्के सवलतीचा लाभ घेण्याची मुदत आहे. अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत.
थकबाकीदार 14 मिळतदारांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव प्रक्रिया चालू झाली आहे. 14 पैकी आठ मिळकतदारांनी थकबाकी भरली आहे. 6 थकबाकी भरली नाही. त्यामुळे त्यांच्या मिळकतीची लिलावाची प्रक्रिया केली आहे. लिलाव प्रक्रियेची माहिती ऑनलार्ईन जाहीर करण्यात आली आहे. जास्तीतजास्त जणांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.