Solapur News: महापालिकेच्या बदललेल्या प्रभाग रचनेने अनेकजण डेंजर झोनमध्ये

भाजपची खेळी; आमदार देवेंद्र कोठे यांचा वरचष्मा
Solapur News: महापालिकेच्या बदललेल्या प्रभाग रचनेने अनेकजण डेंजर झोनमध्ये
Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना सोमवारी (दि. 13) जाहीर झाली. या प्रभाग रचनेत दहा प्रभागात बदल करण्यात आले. भाजपच्या खेळीमुुळे अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग डेंजर झोनमध्ये गेले आहेत. भाजपच्या खेळीने महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. याचा फार मोठा परिणाम उमेदवारी वाटप करताना होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेचे विरोधी पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले असले तरी काही प्रभाग विरोधकांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

प्रभाग 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20 आणि 21 या प्रभागांमध्ये काही भागांची अदलाबदल करण्यात आली आहे. तसेच काही बूथचे स्थलांतरणही करण्यात आले. प्रभाग सहामधील लक्ष्मी-विष्णू चाळ व एक्झीबीशन हॉल परिसर प्रभाग 15 मध्ये समाविष्ट करण्यात आला. यामुळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे 15 मधून उभारण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 15 मधील मुल्लाबाबा टेकडी परिसर प्रभाग 14 ला जोडल्याने मुस्लीम मतदार कमी होणार आहेत. याचा परिणाम म्हणजे 15 मधील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या पॅनलला संघर्ष करावा लागेल. प्रभाग 14 मधील अश्विनी हॉस्पिटल परिसर प्रभाग 16 मध्ये समाविष्ट करण्यात आला, त्यामुळे काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल, नरसिंग कोळी यांना अडचण होणार आहे. प्रभाग 16 मधील विकास नगर, ईएसआय हॉस्पिटल, ईदगाह मैदान हा भाजपला मानणारा परिसर प्रभाग एमआयएमचे चार नगरसेवक असलेल्या 21 मध्ये समाविष्ट केला.

बाबा मिस्त्रीसह काँग्रेसचे चार नगरसेवक असलेल्या प्रभाग 20 मधील स्वागत नगर परिसर प्रथमेश कोठे यांच्या प्रभाग 10 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भाजपच्या फेवरमधील प्रभाग 19 मधील विनायक नगर परिसर विनायक कोंड्याल यांच्या प्रभाग 12 ला जोडण्यात आला. तर दिवंगत महेश कोठे यांच्या प्रभाग 11 मधील कोटा नगरलगत असलेला परिसर प्रभाग 10 मध्ये समाविष्ट करण्यात आला. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. यावेळी असलेले एकूण 102 जागांपैकी भाजप - 49, शिवसेना - 21, काँग्रेस - 14, राष्ट्रवादी काँग्रेस - 4, एमआयएम - 9, बसपा -4, माकपा -1 असे पक्षीय बलाबल होते. यापूर्वी महापालिका निवडणूक 2017 मध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग होता. यात प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी तर दोन जागा सर्वसाधारण अशी रचना होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news