Solapur Municipal Corporation: महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न; बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल
Self-immolation attempt
Solapur Municipal Corporation: महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न; बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Published on
Updated on

सोलापूर : महानगरपालिकेच्या इंद्रभुवन येथे युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे व अन्य दहा ते बारा जण येऊन अंगावर डिझेलसदृश्य तेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांत १० ते १२ जणांच्या विरोधात शासकीय कार्यालयात उपद्रव केल्याने सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या १२ जून रोजी पत्र दिले आहे, असे म्हणत गुरुवार, २५ जून रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डोलारे, वनमाला दत्तू कदम, ममता देवदास मोरे, लक्ष्मी विठ्ठल वाघमारे, दत्तात्रय शाहू चव्हाण, इंदुबाई दत्तू कांबळे व अन्य तीन ते चार जण कार्यालयात येऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांनी असे करू नका, असे समजावून सांगत होते.

याच दरम्यान घोषणाबाजी करत असलेले उपस्थित कार्यकर्ते यांनी आपल्याकडील डिझेलसदृश्य ज्वालाग्रही अंगावर ओतून घेऊन शासकीय कर्तव्य पार पाडण्यास प्रशासनास सक्ती करण्याचे व वेठीस धरण्याच्या उद्देशाने आत्मदहन प्रयत्न केला व गोंधळ घालत शासकीय कार्यालय व परिसरात उपद्रव करून स्वतःसह इतरांचे जीवित धोक्यात आणण्याचे कृत्य केल्याने याप्रकरणी महादेव दत्तात्रय शेरखाने, रा. अशोक नगर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news