Solapur News: महापालिकेसाठी पुन्हा उद्या निघणार आरक्षण

महापालिकेतील काही जागांवरील आरक्षणात बदल होणार असल्याने त्याचा राजकीय फटका कोणाला बसणार, हे स्पष्ट होणार
Solapur News: महापालिकेसाठी पुन्हा उद्या निघणार आरक्षण
Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा सोमवारी, दि. 17 नोव्हेंबर आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेतील काही जागांवरील आरक्षणात बदल होणार असल्याने त्याचा राजकीय फटका कोणाला बसणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.

गेल्या मंगळवारी, दि. 11 नोव्हेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण निश्चिती करण्यात आली होती. परंतु, ओबीसी आरक्षणाची एक जागा कमी झाली होती. त्यामुळे राजकीय आरक्षणातील नियम पाळले नसल्याचा मुद्दा समोर आला होता.

त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत 14 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत दि.17 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीस संबंधित जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news