Jaykumar Gore: पालकमंत्री गोरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस

खा. प्रणिती शिंदे यांच्या वकीलांनी पाठविली नोटीस
Praniti Shinde |
खासदार प्रणिती शिंदे File Photo
Published on
Updated on

सोलापूर : अब्रुनुकसानी केल्याबद्दल खा. प्रणिती शिंदे यांचे वकील असीम सरोदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटिस पाठविली आहे. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

दि.8 मे 2026 रोजी सोलापूरमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस खा. शिंदे यांना लक्ष्य करून पालकमंत्री गोरे यांनी एक विधान केले होते. खा. शिदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात, असा त्या विधानाचा सूर होता.

सोलापूरमधील 82 किलोमीटरच्या मोहोळ-वळसंग रस्त्यावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाई दरम्यान पालकमंत्री गोरे यांनी विधान केले होते. या विधानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्यामुळे खा. शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. त्या विधानाचा सूर आणि ज्या पद्धतीने ते वाक्य म्हटले तो हेतू कलुषित होता. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांना कायदेशीर नोटिस पाठविण्यात आले आहे.

हेतू चारित्र्यहननचा असल्याने नोटिस : ॲड सरोदे

आमच्या अशिलाला फक्त राहुल गांधी यांच्या घराचा रस्ता माहित आहे, असे म्हणतांना जयकुमार गोरे यांचा स्पष्ट हेतू लैंगिक दृष्टिकोनातून टिप्पणी करण्याचा आणि एका महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा होता. गोरे यांना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाशी त्यांचे विधान पूर्णपणे अप्रासंगिक आणि अनावश्यक होते. त्यामुळे गोरे यांना कायदेशीर नोटिस देण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news