Solapur Municipal Corporation: चेसी क्रॅक बसेस प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई

परिवहनच्या 64 कोटींच्या अंदाजपत्रकाला एकमताने सभागृहाची मान्यता
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation (Pudhari File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचा सन 2026- 27 या आर्थिक वर्षाचा 64 कोटी 50 लाखांच्या अंदाजपत्रकाला महापालिका सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. यापूर्वी केंद्रशासनाच्या जेएनयुआर योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या शंभर बसेस चेची क्रॅक प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या सभागृहात परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रकावर विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर विनायक कोंड्याल हे होते. अद्यापही महापालिका परिवहन समिती स्थापन न झाल्याने परिवहन उपक्रम प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत मान्यता देऊन पुढील शिफारसी साठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले होते. यानुसार सर्वसाधारण सभेत हा अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी मांडला. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी या संदर्भातील सूचना केली. विरोधी पक्षाकडून यावर कोणतीही उपसूचना न आल्याने झटक्यातच महापालिकेचा अंदाजपत्रकाला एकमताने महापौरांनी मान्यता दिली.

सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 10 ते 12 बसेस धावलेले असून आता बसेसची संख्या ही 35 इतकी दाखविण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात सन- 2026-27 मध्ये केंद्र शासनाकडून येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 30 बसेससह 40 पेक्षा अधिक बसेस धावणार असल्याचे दाखवत त्यामधून उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांची सोय होणार असल्याचे नव्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गतवर्षी परिवहनचे अंदाजपत्रक हे 59 कोटी 31 लाखाचे होते. यामध्ये यंदा 5 कोटी 19 लाख रुपये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेकडून परिवहन विभागाला अनुदान स्वरूपात 14 कोटी रुपये मिळालेले आहे. शिवाय आता चालू आर्थिक वर्षात देखील महापालिकेकडून 17 कोटी 32 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासह विविध जमा खर्च दाखविण्यात आले असून या अंदाजपत्रकाला सभागृहात मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news