Solapur Airport : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

आठवड्यातून चार दिवस सेवा : सोलापूर - गोव्यासाठी प्रतीक्षाच
solapur mumbai flights
solapur mumbai flights
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जूनपासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार असे आठवड्यात चार दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे. कंपनीने त्यांचे ऑनलाईन बुकिंग काऊंटर सुरू केले असून, वेळापत्रक आणि तिकीट दर स्टार एअरलाईनच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. परंतु, सोलापूर - गोवा विमानसेवेसंदर्भात अद्याप प्रतीक्षाच आहे.

स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा २८ जूनपासून तांत्रिक कारणांमुळे बंद होती. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, रुग्ण, नोकरदार यांची मोठी गैरसोय होत असल्याने सोलापूरकरांनी ही सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.

आगमन व प्रस्थान

सोमवार आणि बुधवार - आगमन सायंकाळी ५.१० वाजता आणि प्रस्थान सायंकाळी ५.४० वाजता, शुक्रवार आणि रविवार - आगमन दुपारी १.३० वाजता आणि प्रस्थान दुपारी २ वाजता. विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा दि. २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरपर्यंत राहणार असून, त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news