Solapur Mumbai flight: मुंबईत 15 ऑक्टोबरला विमानसेवेचा शुभारंभ

बंगळुरु सेवा प्रतीक्षेत
Solapur Mumbai flight|
Solapur Mumbai flight: मुंबईत 15 ऑक्टोबरला विमानसेवेचा शुभारंभFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : बहुप्रतिक्षित मुंबई-सोलापूर विमानसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील विमानतळावरुन होणार आहे, अशी माहिती संबंधित विमानसेवा कंपनीच्यावतीने देण्यात आली. परंतु सोलापूर-बंगळुरु विमानसेवा कधी सुरू याची अजून प्रतीक्षाच आहे.

सेवेचे सर्व करांसह प्रारंभीचे भाडे 3 हजार 999 रुपये असणार आहे. या हवाई सेवेचे पहिले उड्डाण बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही सेवा महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत आठवड्यातून चार दिवस - मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार - उपलब्ध असेल. या मार्गामुळे व्यावसायिक तसेच पर्यटकांसाठी अधिक सोयीस्कर होणार असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे. सोलापूर हे उद्योग, शिक्षण व संस्कृतीचे केंद्र असून या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. मुंबईशी व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

फ्लाईट एस5 333 : मुंबईहून दुपारी 12:50 ला सुटेल, सोलापूरला 14:10 ला पोहोचेल

फ्लाईट एस5 334 : सोलापूरहून 14:40 ला सुटेल, मुंबईला 15:45 ला पोहोचेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news