Solapur Student Death | परीक्षा संपताच मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले

मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील घटनेने खळबळ
Ended Life Cases
Ended Life Cases (Pudhari File Photo)
Published on
Updated on

Mohol Engineering Student Death

पोखरापूर: अज्ञात कारणावरून २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास घेवून जीवन संपविले. ही घटना मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे शनिवारी (दि. ४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. सुरज रामचंद्र करे असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र दत्तात्रय करे हे लांबोटी (ता. मोहोळ) येथे शेती करून उपजिवीका करतात. त्यांचा मुलगा सुरज हा मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा संपल्यानंतर तो दहा दिवसांपूर्वी गावी आला होता. आज सकाळी ८. ३० च्या सुमारास त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले.

Ended Life Cases
Solapur Crime News : मोडनिंब येथे दिवसा ढवळ्या बंद घरात चोरी, दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला

त्याच्या कुटूंबीयांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता, तो घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास तत्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शाम करे यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास पो. हे. कॉ. उपासे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news