Solapur Mohol house theft|मोहोळ मधील कुंभारखाणीत भरदिवसा घरफोडी; ४ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास

Solapur|मोहोळ मधील कुंभारखाणीत भरदिवसा घरफोडी; ४ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

मोहोळ : मोहोळ शहरातील कुंभारखाणी परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडले. चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केशव तानाजी यमगर (व्यवसाय सुतारकाम, रा. कुंभार खाणी, मोहोळ) यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यमगर हे पत्नी अनिता यांच्यासह मोहोळ शहरातीलच दत्तनगर येथे कामानिमित्त १ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला व बाहेरील गेटला कुलूप लावून पत्नीसमवेत गेले होते. काम संपवून दुपारी सुमारे १.४५ वाजता ते घरी परतले असता घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

घरात प्रवेश करून पाहणी केली असता लोखंडी कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल-बुगडी तसेच ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि २ लाख ५० हजार रुपये रोख, असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

theft
Satara Sugarcane Cutting : शिवाराशिवारात होणार ऊसतोडीचे धुमशान; विदर्भ, मराठवाड्यातील मजूर जिल्ह्यात दाखल

भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेनंतर मोहोळ पोलीस ठाण्याकडून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलविण्यात आले होते . श्वान काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणीच घुटमळले. पोलिसांकडून या चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दासरी करीत आहेत.

theft
Solapur House Burglary : महालक्ष्मी सोसायटीतील दोन घरे फोडली
logo
Pudhari News
pudhari.news