Solapur Crime | कामती येथे शेतीच्या वादातून तलवारीने वार करत चुलत्याचा खून; भावजयसह दोन पुतण्यांविरुद्ध गुन्हा

मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील लमाण तांडा परिसरात घटना
 Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

Mohol Kamati Crime News

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील लमाण तांडा परिसरात सहा एकर शेतीच्या वादातून शेतकरी संजीवकुमार नागनाथ शिंदे (वय ५२) यांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. २२ ) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी पत्नी सुनिता संजीवकुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सुरेखा सतीश शिंदे, रणजीत सतीश शिंदे व रितेश सतीश शिंदे यांच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे हे सकाळी दूध व पाणी आणण्यासाठी गावात गेले असता शेजारील डाळिंब बागेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी सुरेखा सतीश शिंदे यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, तर रणजीत शिंदे व रितेश शिंदे यांनी तलवारीने हात, गळा व डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी सुनिता शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 Crime News
Solapur news | भाजपाचे राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे नेण्यात आला . फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे यांनी त्यांच्या नावे असलेली सहा एकर शेती इतरांना विकल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून कामती पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news