Solapur Tobacco Seizure : मोहोळमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; १.३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वडवळ येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ३० किलो मावा, सुगंधित तंबाखू, पॅकिंग मशीनसह साहित्य जप्त
Tobacco seizure
Tobacco seizurePudhari Photo
Published on: 
Updated on: 

मोहोळ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सुगंधित तंबाखू, मावा, पॅकिंग मशीन आणि पॅकिंग साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी मुस्तफा शकील सय्यद (रा. सय्यद वस्ती, वडवळ, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह

अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकारी रेणुका रमेश पाटील यांनी याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास वडवळ येथील सय्यद वस्तीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीच्या उद्देशाने साठा केल्याचे आढळून आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून संबंधित साहित्य जप्त केले. या कारवाईत 'सॅफ्रॉन ब्लेंडेड प्रीमियम पान' नावाची २६० पाकिटे, विनालेबल लाल रंगाच्या सुगंधित तंबाखूची १० पाकिटे, पिवळ्या रंगाच्या सुगंधित तंबाखूची १० पाकिटे, सुमारे ३० किलो मावा, एक छोटे सीलिंग मशीन, एक मोठे पॅकिंग मशीन आणि पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले.

प्रतिबंधित पदार्थांच्या साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी १३ जुलै २०२६ रोजी अधिसूचना जारी करून सुगंधित तंबाखू व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री यावर निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित पदार्थांचा साठा केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२७ वाजता मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११०३/२०२६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.