Solapur News : मोडनिंबच्या चिमुकल्यांचा पुन्हा वनवास सुर

जलजीवनच्या पाईपसोबतच अंगणवाडीचा आसराही जळाला
Solapur News : मोडनिंबच्या चिमुकल्यांचा पुन्हा वनवास सुर
Published on: 
Updated on: 

मोडनिंब : मोडनिंबच्या दत्तनगर भागात मंगळवारी लागलेल्या आगीत जलजीवनच्या पाईपसोबतच गणपती मंदिरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. यात सर्वात मोठा फटका बसला आहे तो येथे भरणाऱ्या अंगणवाडीला. आधीच हक्काच्या खोलीविना असलेल्या या अंगणवाडी क्रमांक २ ला गणपती मंदिराने आसरा दिला होता, तो आसरादेखील आता या आगीने हिरावून घेतला आहे.

दत्तनगर येथील अंगणवाडी क्रमांक २ ची गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या इमारतीअभावी फरपट सुरू आहे. येथील चिमुकल्यांचे शिक्षण गणपती मंदिराच्या ओट्यावर भरत होते. मंदिराने दिलेल्या या आसऱ्यावरच ही अंगणवाडी क्रमांक २ कशीबशी सुरू होती. परंतु भीषण आगीत जलजीवनच्या पाईपसोबतच हे गणपती मंदिरही जळून खाक झाले.

आता अंगणवाडी क्रमांक २ भरणार कुठे? हा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. आधीच खोली नसल्याने वणवण भटकणाऱ्या या अंगणवाडीवर आता पुन्हा एकदा वनवासाची वेळ आली आहे. निसर्गानेही या चिमुकल्यांचा आसरा काढून घेतला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का? या चिमुकल्यांना हक्काची खोली मिळणार का, की पुन्हा एकदा ही अंगणवाडी वाऱ्यावरच भरवली जाणार? असा संतप्त सवाल दत्तनगरमधील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news