Solapur MLC Election: खा. मोहिते-पाटलांची एकाकी झुंज

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडले सोलापुरात ठाण
Solapur MLC Election: खा. मोहिते-पाटलांची एकाकी झुंज
Published on
Updated on

सोलापूर : सुरुवातीला एकतर्फी आणि बिनविरोधच्या चर्चा सुरू असतानाच संख्याबळ नसतानाही राष्‍ट्रवादी शरद पवार गटाने वसंतराव देशमुख यांना भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विराधोत विधान परिषदेला उमेदवारी दिली. त्याचे नेतृत्व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी करत असल्याने पुन्हा मोहिते-पाटील विरुध्द जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आमने सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजपकडे संख्याबळ असतानाही ही निवडणूक चांगलीच गाजत आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. सुरुवातीला भाजपसमोर एक सक्षम आव्हान उभे राहील आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यांना साथ देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी भाजपला सहकार्य करण्याचे संकेत दिल्याने मोहिते-पाटील यांच्या राजकीय गणिताला धक्का बसल्याचे दिसून आले. आमदार बाबासाहेब देशमुख, उत्तमराव जानकर, नारायण पाटील आणि अभिजित पाटील यांच्यासह काही स्थानिक नेत्यांची भूमिका भाजपसाठी अनुकूल अशी घेतली. त्यामुळे आता मोहिते-पाटील यांचे स्वकीय हात सोडल्याने एकाकी पडल्याचे चित्र आहे.

परंतु मोहिते-पाटील यांची रणनीती ही आतापर्यंत धक्कादायक ठरल्याने भाजपने आपली संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील संपर्क यंत्रणा सक्रिय केली आहे. दुसरीकडे मोहिते-पाटील यांनीही आपला राजकीय प्रभाव वापरत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिग्गज नेते प्रचारात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदेसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात प्रचाराच्या बैठका घेतल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातच तळ ठोकून प्रचाराची यंत्रणा, बैठकींचा सिलसिला जारी ठेवला आहे. तर खा. ज्योती वाघमारे या महायुतीच्या बैठकीत उपस्थिती दाखवित आहेत. तर दुसरीकडे बाबासाहेब देशमुख, विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, नारायण पाटील, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, उत्तमराव जानकर हे नऊ विद्यमान आमदार भाजपच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. तर शहाजी पाटील, संजय मामा शिंदे, राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, धनाजी साठे, प्रशांत परिचारक, राम सातपुते या आठ माजी आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. तर मोहिते-पाटील यांच्या पाठीमागे आ. राजू खरे, आ. दिलीप सोपल यांनी उभे राहत राष्‍ट्रवादी शपचे उमेदवार वसंत देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news