

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नीलेश नामदेव रणदिवे (वय 19, रा. खडकी, पो. नंदेश्वर, ता. मंगळवेढा) असे त्याचे नाव आहे. निलेश याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले.
प्रेमाचे नाटक करुन तिला पुण्यातील कडेगाव, चौफुला येथे घर सोडून येण्यास भाग पाडले. त्यानंतर एक डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान वारंवार अत्याचार केला. मुलगी सापडल्यानंतर मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फौजदार राधिका जेऊघाले तपास करत आहेत.