Solapur Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

पॉक्सोसह विविध कलमांन्वये कारवाई
Solapur Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
Pudhari
Published on: 
Updated on: 

मोहोळ : मोहोळ शहरातील नेताजी शाळेजवळील परिसरात आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात पिंटू उर्फ दत्तात्रेय शेगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ३० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या आठ वर्षीय मुलीसह आणि सासूसोबत आरोपीच्या मोहोळ येथील घरी गेली होती. तक्रारदार महिलेने आरोपीकडे उसने दिलेले सात लाख रुपये परत करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आरोपीने पैसे दुसऱ्या दिवशी देण्याचे सांगून त्या रात्री घरात राहण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर तक्रारदार महिला, तिची सासू आणि अन्य महिला काही वेळासाठी बाहेर गेल्या. त्या परत आल्यानंतर तक्रारदाराची अल्पवयीन मुलगी रडत असल्याचे आढळून आले. मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्यासोबत अश्लील व लैंगिक स्वरूपाचे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकाराबाबत आरोपीला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे भीतीपोटी तत्काळ तक्रार न करता कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news