Solapur MIDC Fire: एमआयडीसीत टॅावेल कारखान्‍यास आग

कारखान्यातील कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक
Solapur MIDC Fire: एमआयडीसीत टॅावेल कारखान्‍यास आग
Published on
Updated on

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील लेक एक्‍झिम या टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली.

शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्‍या सुमारास कारखान्याच्‍या बॉयलरजवळ आग लागली. तेथे असणाऱ्या कापूस आणि लाकडांना आग लागल्याने ती लवकर पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आणि कारखानदारांनी तातडीने अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली.

मात्र, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होण्यास मोठा विलंब झाला असल्याची माहिती स्थ्यनिक नागरिकांनी दिली. ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणामुळे अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा आकडा कळू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news