Medical Coding : मेडिकल कोडिंगच्या क्षेत्रात तरुणांना करिअरच्या संधी

आरोग्य व आयटी क्षेत्राचा संगम; इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डचा वापर वाढला
Medical
Medical
Published on: 
Updated on: 
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : प्रत्येक दिवशी आरोग्य क्षेत्र नवनवे बदल स्वीकारत आहे. आता डिजिटायझेशन व इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डच्या वापराने मेडिकल कोडिंग क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय माहितीचे संगणकीय पद्धतीने वर्गीकरण करून त्याचे विशिष्ट कोडमध्ये रूपांतर करण्याचे काम मेडिकल कोडर्स करतात. यासाठी हेल्थकेअर व माहिती-तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची प्रक्रिया वाढत असून यामुळे तरुणांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णांच्या वैद्यकीय नोंदींच्या अचूक कोडिंगच्या कामासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते.अमेरिकन असोसिएशन ऑफ प्रोफेशनल कोडर्स (एएपीसी) या संस्थेमार्फत मेडिकल कोडिंगसाठी प्रमाणपत्र परीक्षाही घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

एमबीबीएस, फार्मसी, जीवशास्त्र, नर्सिंग, मायक्रोबायोलॉजी व बायोटेक्नॉलॉजीसह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेश करता येतो. त्यासाठी वैद्यकीय परिभाषा, कोडिंगचे नियम व संबंधित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आवश्यक आहे. विविध रुग्णालये, आरोग्य विमा संस्था, मेडिकल बिलिंग कंपन्या, हेल्थकेअर बीपीओ आणि आयटी कंपन्यांमध्ये मेडिकल कोडर्सना संधी उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असला, तरी माहितीची अचूकता तपासणे आणि योग्य कोड निश्चित करणे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची जागतिक स्तरावरही गरज आहे.

मेडिकल कोडिंग म्हणजे काय?

रुग्णाच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करणे.

डॉक्टरांचे निदान, लक्षणे व उपचार समजून घेणे.

शस्त्रक्रिया, तपासण्या व वैद्यकीय प्रक्रियांचे विशिष्ट कोडमध्ये रूपांतर करणे.

आरोग्यविषयक माहितीचे अचूक व प्रमाणित वर्गीकरण करणे.

कोणाला मिळणार संधी?

एमबीबीएस, फार्मसी, बीएस्सी जीवशास्त्र व मायक्रोबायोलॉजी, नर्सिंग, लाइफ सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी व विज्ञान शाखेतील विद्यार्थी.

संबंधित प्रशिक्षण आणि अभ्यास पूर्ण करून प्रमाणपत्र परीक्षेला बसण्याची संधी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.