Medical Admission: 'एमडी'साठी ६ हजार ९९२ जागा

देशात ६३ हजारांहून अधिक जागा वाढल्या; आणखीही वाढीची शक्यता
Doctor
DoctorPudhari
Published on: 
Updated on: 
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) वैद्यकीय मूल्यांकन व मानांकन मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार देशभरातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमध्ये ६३ हजार १७७ पीजीच्या जागा वाढलेल्या आहेत. या वाढीव जागांचा राज्याला लाभ होणार असून ६ हजार ९९२ पीजी डॉक्टरांच्या संख्येत वाढ होणार आहे.

या वाढीव जागांमध्ये एमडी, एमएस, पदव्युत्तर पदविका तसेच डीएम व एमसीएचसारख्या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध जागांची संख्या वाढली आहे. यात कर्नाटकला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. तर गुजरात व राजस्थानला कमी जागा मिळालेल्या आहेत. एनएमसीने २९ सप्टेंबरपर्यंत मंजूर झालेल्या प्रवेश क्षमतेच्या आधारे ही यादी तयार केली आहे.

नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान अभ्यासक्रमांच्या जागा वाढवण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत; मात्र अद्याप मंजुरी न मिळालेल्या प्रस्तावांचा सध्याच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. आगामी काळात या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास पीजीच्या जागांमध्ये आणखी वाढ होतील. त्यानंतर एनएमसीकडून सुधारित प्रवेश क्षमता जाहीर केली जाणार आहे.

मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश नाही

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) च्या वैद्यकीय मूल्यमापन आणि मानांकन मंडळाने (एमएआरबी) प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेनुसार, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश फक्त मंजूर जागांवरच करणे संबंधित महाविद्यालयांना बंधनकारक आहे. कोणत्याही महाविद्यालयाला मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. असे प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

राज्यानुसार उपलब्ध जागा

महाराष्ट्र : ६ हजार ९९२, कर्नाटक : ८ हजार ३२३, उत्तर प्रदेश : ५ हजार ९०, तामिळनाडू : ६ हजार ३०६, आंध्र प्रदेश : ४ हजार १४२, तेलंगणा : ३ हजार ९९८, गुजरात : ३ हजार ८६२, राजस्थान : ३ हजार ८५७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news