Solapur MBBS Admission Fraud: एमबीबीएसला ॲडमिशन देतो म्‍हणून १४ लाखांची फसवणूक

तेलंगणातील एकावर गुन्हा दाखल
MBBS Admission Fraud
MBBS Admission FraudPudhari
Published on
Updated on

सोलापूर : तेलंगणा येथील मेडिकल कॉलेजमध्ये मुलास ॲडमिशन मिळवून देतो म्‍हणून सोलापुरातील एकाची १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तेलंगणातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. इफ्‍तेकार इसाक कादरी (रा. उस्‍मानपुरा, हैदराबाद, तेलंगणा) असे त्याचे नाव आहे. मुर्तुज अ. सत्‍तार खरादी (रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

मुर्तुज यांचा मुलगा खुद्दुस याला तेलंगणा येथील डेक्‍कन मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो म्‍हणून आमिष दाखविण्यात आले. सदर कॉलेजचे नाव असलेले एक्‍सेप्‍टन्‍स लेटर, बनावट पत्र देऊन त्‍यांचा विश्वास संपादन केला. त्‍यानंतर ॲडमिशनसाठी तब्‍बल १५ लाख रुपये घेतले. त्‍यानंतरही ॲडमिशन न झाल्याने मुर्तुज यांनी पैसे परत मागितले.

त्‍यामुळे कादरी याने त्‍यातील एक लाख रुपये परत दिले; मात्र १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. याबाबत मुर्तुज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इफ्‍तेकार कादरी याच्‍या विरोधात जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news