Solapur municipal corporation: प्रस्तावित १३७८ कोटी प्रकल्प संदर्भात महापौरांची आढावा बैठक

शहरातील सर्व भागात समान पाणीपुरवठा होणार
Solapur municipal corporation: प्रस्तावित १३७८ कोटी प्रकल्प संदर्भात महापौरांची आढावा बैठक
Published on
Updated on

सोलापूर : शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणी करताना शहराच्या सर्व भागात समान पाणीपुरवठा धोरण असेल, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

महापालिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या. यानुसार शुक्रवारी झोन क्रमांक एक आणि दोनची बैठक झाली. या बैठकांमध्ये उपस्थित नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या. महापौर कोंडयाल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवकांनी विविध तांत्रिक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबवून कामांना गती देण्याचे आदेशही महापौर विनायक कोंडयाल यांनी दिले. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, यांच्यासह विभागीय कार्यालयांचे अधिकारी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news