

सोलापूर : घरात फर्निचर करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. प्रतीक्षा रोहित अक्कलकोटे (वय 24, रा. कलावती नगर, एमआयडीसी, सोलापूर) हिचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. लग्नात सोने दिले नाही, आता नव्या घरातील फर्निचरसाठी दोन लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली.
याबाबत पती रोहित, सासू सुरेखा, सासरे संतोष, आजी सासू सर्वमंगल, चुलत सासू महादेवी, दिर गणेश, चुलत नंणंद सुप्रिया यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.