Solapur Dowry Harassment: पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ
Women Harassment Case
Women Harassment CasePudhari
Published on
Updated on

सोलापूर : माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हनिफाबी हैदरअली कपाडीया (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, पती हैदरअली याच्यासह महिबुब्बी-सासू आणि वहाब-सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचा संसार सुरू असताना आरोपींनी संगनमत करून तिच्याकडे माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली.

या मागणीसाठी तिला नेहमी उपाशीपोटी ठेवणे, शिवीगाळ व मारहाण करणे अशा प्रकारे त्रास देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news