Solapur Dowry harassment: पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण
Women Harassment Case
Women Harassment CasePudhari
Published on
Updated on

सोलापूर : नवीन घर खरेदी करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी २८ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना घडली.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर्णा चंद्रकांत राजगुरु (वय २८, रा. १०४३, संजय गांधी नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती चंद्रकांत, सासू सुनिता, दीर श्रीकांत, जाऊ श्रद्धा आणि तेजस्नी (सर्व रा. लक्ष्मण नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

२१ नोव्हेंबर २०२१ पासून ते आजतागायत सासरी हा प्रकार सुरू होता. आरोपींनी संगनमत करून ५ लाख रुपयांची केली. सतत शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. तसेच हुंड्यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २५ जुलै २०२६ रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news