Solapur News : विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले

बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील घटना
Women ended life
Women ended life
Published on: 
Updated on: 

बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मी विलास सुपेकर (रा. कोरफळे, ता. बार्शी) ही महिला घरकाम करीत होती. दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते दि. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यानच्या काळात तिने राहत्या घरातील खोलीमध्ये जीवन संपवले. विलास दत्तात्रय सुपेकर (रा. कोरफळे) यांनी फिर्याद दिली.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात कारणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोरफळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. अमित घाडगे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news