Solapur Marriage Fraud: लग्नासाठी स्थळे दाखवण्याच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक

सर्वजण मोहोळ तालुक्यातील : धाराशिवच्या महिलेवर गुन्हा दाखल
Marriage Fraud
Marriage FraudPudhari
Published on
Updated on

पोखरापूर : लग्नसाठी मुली बघते असे सांगून स्थळ न दाखवता पाच जणांकडून प्रत्येकी सव्वा लाख रुपये प्रमाणे सहा लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्योती राहूल बनसोडे ( रा. धाराशिव) असे या महिलेचे नाव आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील सागर बंकट ताकमोगे (वय ३३) हा शेती करतो. तो लग्नासाठी मुली पहात होता. एप्रिल २०२५ मध्ये ज्योती यांनी सागर यांना माझ्याकडे अनाथ आश्रमामधील मुलींची भरपूर स्थळे आहेत असे सांगितले. तसेच तिने काही मुलींची माहिती सागरला दिली. त्यानंतर ज्योतीने या स्थळांसाठी सागर यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे एक लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर ज्योतीने मुलींचे बायोडेटा पाठविले. सागरने पसंत पडलेल्या मुलीच्या नातेवाईकांशी बोलणे करून बैठक बसवण्यासाठी सांगितले.

मात्र थोड्या दिवसांनी बोलणे करते, सांगते, बघते, २५ जणांचे विवाह जुळवून ते एकत्र करणार आहे असे ज्योतीने सांगितले. या दरम्यान सागरने पैसे परत मागितल्यावर ज्योतीने फोन स्वीकारणेच बंद केल्याने सागरने मोहोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या विवाहेच्छुकांची ज्योतीने केली फसवणूक

सागर ताकमोगे यांच्याशिवाय कांता काकासाहेब मोटे (रा. वाळुज), आरती आनंद रणशूर (रा. वाळुज), सागर परमेश्वर जाधव (रा. देगांव (वा.), अमोल नागनाथ भोंग (रा. देगाव) यांचेकडून ज्योतीने प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपयांप्रमाणे सहा लाख २५ हजार रुपये लग्नासाठी मुली बघते म्हणून वेळोवेळी घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news