

सोलापूर : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटत आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार्या आंदोलनासाठी सोलापुरातून शेकडो मराठा बांधव रवाना होणार आहेत. गुरुवार, दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होम मैदानावर एकत्र येत मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. सोबत आठ दिवसाची शिदोरी घेऊन मराठे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आरपारची लढाईसाठी सज्ज झाले आहेत.
मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुुकारला आहे. मनोज जरांगे-पाटील अंतरवली सराटी येथून लाखो समाज बांधवाना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 29 ऑगस्ट रोजी मुुंबईत आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन केेले जाणार आहे. आरक्षणासाठी मराठ्याची ही आरपारची लढाई असल्याने मिळेल्या वाहने घेऊन मुंबई गाठण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केेले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक व महिलांनी पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत समाजातील तरुणाई त्यांच्यामागे उभी राहिली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत होणार्या आंदोलनासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून टेम्पो, ट्रॅव्हल्स, एसटी, रेल्वे, खासगी चारचाकीसह दुचाकी गाड्यांच्या दीड ते दोन लाख समाज बांधव जाणार आहेत. एक घर एक गाडी, मकुणबी नोंद आहे त्यांनी एक घर चार गाड्या, तसेच प्रत्येक गावातून साधारणत दहा ते पंधरा गाड्या निघार आहेत. सोलापूर शहरातून दहा हजार गाड्यातून समाज बांधव जाणार आहेत. सकाळी दहा वाजता शहराच्या विविध भागातून होम मैदानावर एकत्र येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून एकत्र हे समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.
आठ दिवसांसाठीचे साहित्य घेतले सोबत
आंदोलनामुुळे मुंबई जाम होणार आहे. त्यामध्ये गणेश उत्सव असल्याने खाण्याचे मोठे वांदे होऊ नये म्हणून कडक भाकरी, धपाटे, बाजरीच्या भाकरी शेंगा चटणी, हिरव्या मिरचीचा ठेच्यासह आठ दिवसाचे खाण्याचे साहित्य सोबत घेऊन निघण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.