Farmers loan waiver: मंगळवेढामधील सर्वाधिक शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

जिल्‍हा बँकेकडून सात हजार ६९४ कर्जदारांची माहिती अपलोड
Farmers loan waiver
Farmers Loan Waiver Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती बँकेकडून ७ हजार ६९४ जणांची यादी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्‍यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्‍यामुळे या तालुक्‍यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्‍यता आहे.

सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने बँकेच्या वतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

उत्तर सोलापूर : १५६, दक्षिण सोलापूर : ३०६, पंढरपूर : ८५७, सांगोला : ४७२, माळशिरस : १००९, बार्शी : ३४४, करमाळा : १००३, मोहोळ : ७२६, करमाळा : १००२, अक्कलकोट : २४०, मंगळवेढा :१५७९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news