Solapur loan fraud: कर्जाचे आमिष दाखवून 3.98 लाखांची फसवणूक

बँक व प्रायव्हेट फंडिंगमधून व्यवसायासाठी कर्ज करून देतो, असे खोटे आश्वासन
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

बार्शी : बँक व प्रायव्हेट फंडिंगमधून व्यवसायासाठी कर्ज करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन बार्शीतील एका व्यावसायिकाची 3 लाख 98 हजार 650 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अल्ताफ अख्तर मोमीन (वय 35, रा. बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रशांत कमलाकर बडेकर (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) याने दि. 4 फेब्रुवारी 2024 ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत इकेरा कलेक्शन, बार्शी येथे व ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधला. आरोपीने व्यवसायासाठी बँकेकडून तसेच खासगी फंडिंगद्वारे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडून फिर्यादी मोमीन यांनी वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात आरोपीला एकूण 3,98,650 रुपये दिले. मात्र, आरोपीने कर्ज मंजूर करून दिले नाही. फिर्यादीने वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपीने रक्कम परत केली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोमीन यांनी पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला होता.या अर्जाच्या चौकशीनंतर सहा. संचालक व सरकारी अभियोक्ता विकास नारायण देशपांडे (सोलापूर) यांच्या व उपविभागीय पोलिस अधिकारी, करमाळा-बार्शी विभाग यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सोनमाळी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news