Solapur chain snatching: मजरेवाडीत चाकूचा धाक दाखवून वृद्धेचे गंठण पळवले

वृद्धेला अडवून चाकूचा धाक दाखवून तिचे 13 ग्रॅमचे सोन्याचे गंठण पळवण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास घडला
chain snatching
chain snatching(AI Photo)
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील मजरेवाडी येथे वृद्धेला अडवून चाकूचा धाक दाखवून तिचे 13 ग्रॅमचे सोन्याचे गंठण पळवण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास घडला.

जयश्री अरुण केत (वय 72, रा. शिवगंगानगर भाग 4, मजरेवाडी, सोलापूर) या गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दुकानासमोर झाडलोट करीत होत्या. दुकानाचे शटर खाली करून त्या घरात जाण्यासाठी निघाल्या असताना 25 ते 30 वर्षांचा तोंडाला काळे कापड आणि अंगात लाल कोट घातलेला चोरटा त्यांच्याजवळ आला. त्याने जयश्री यांचे ओढणीने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर चाकूने मारण्याची धमकी देत 13 ग्रॅमचे सोन्याचे गंठण घेऊन पोबारा केला.

जयश्री यांनी तत्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली. विजापूर नाका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर

सोलापुरात गेल्या काही दिवसांत घरफोडी तसेच चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मंगळवारी अवंतीनगर येथे चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. त्यानंतर बाळे येथे घर फोडून चार लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहे. त्यानंतर आता होटगी रोडवर हा प्रकार घडल्याने शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news