

सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेस महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाच्या विकासासाठी सिएसआर फंडातून दिलेल्या दोन कोटी 79 लाखांच्या विकास कामांचा करार मंगळवार दि. 22 जुुलै रोजी करण्यात आला. या निधीतून प्राणीसंग्रहालयामधील काळवीटांचे अधिवास व निवासस्थान, बिबट्या व सिंह यांचे क्राल परिसर तसेच मोरांचे अधिवास उभारण्यात येणार आहेत.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, एनटीपीसीचे सोलापूरचे कार्यकारी संचालक बी.जे.सी. शास्त्री, कक्ष विभागप्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभागप्रमुख रफीक उल इस्लाम, अमित सिंग,प्राणी संग्रहालय प्रकल्प विभागाचे उपअभियंता अविनाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या निधीद्वारे प्राणीसंग्रहालयाच्या परिसरातील नैसर्गिक अधिवासाची रचना अधिक सुसज्ज केली जाणार आहे. बिबट्या व सिंहांसाठी आधुनिक व सुरक्षित क्राल उभारणे, काळवीट व मोरांसाठी नैसर्गिक अधिवास तयार केले जाणार प्राणीसंग्रहालय हे सोलापूर शहराच्या पर्यावरणीय जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे.