Solapur Lok Adalat : लोकअदालतीत मिळाली ७१ लाख नुकसान भरपाई

मोटार अपघात प्रकरणाचा तडजोडीने निपटारा
Lok Adalat
Lok Adalatpudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील न्यायालयांत शनिवारी झालेल्या राष्‍ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात प्रकरणाचा तडजोडीने निपटारा झाला. एका वर्षाच्या आत ७१ लाख इतकी नुकसानभरपाई देण्यात आली.

दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी अपघातात कमावत्या मुलाची आई, पत्नी व मुलगी यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या हस्ते विमा कंपनीचे अधिकारी, विधीज्ञ व मृताचे वारस यांना प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला. अशाच प्रकारे सुमारे १४० भूखंडधारकांचा एक दावा, अपघाताच्या दुसऱ्या प्रकरणातील ४० लाख नुकसानभरपाई व आणखी एका दाव्यात झालेली रु. ४७ लाखांची तडजोड ही या लोकअदालतीची विशेष वैशिष्ट्ये ठरली.

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजनापूर्वी दि. ७ सप्टेंबर ते दि. ११ सप्टेंबर या कालावधीत जिल्‍ह्यातील सर्व न्यायालयात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत ४ हजार १९३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news