Solapur Crime : गैरसमजातून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : करकंब (ता. पंढरपूर) शिवारातील नात्याबा मोहिते विठ भट्टीजवळ आरोपी मुकुंदराजा उर्फ मुकुंदराजा बिंदुल उर्फ बिंदुर काळे व फरार बिंदुल नवशा काळे, शालीका बिंदुल काळे यांनी हेमा आकाश काळे हिने शिकवून कलाकेंद्रावर नाचण्यास पाठविले, असा गैरसमज करुन घेतला. या रागाच्या भरात हेमा काळे हिचा खून केला.

याबाबत करकंब पोलीसात गुन्हा दाखल होता. न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोप दाखल होते. त्यावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी आरोपी मुकुंदराज काळे यांना जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दि. ४ जून २०२५ रोजी सायंकाळी करकंब येथे आरोपी मुकुंदराज काळे याने हेमाचा कुराडीने खून केला होता. त्यामुळे मयत हेमाचा पती आकाश काळे यांनी आरोपी विरूध्द करकंब पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. न्यायालयात सरकार तर्फे एकूण १० साक्षीदार तपासले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.