

सोलापूर : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याविषयी मुंबई पोलिस उपायुक्तांकडे सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी परवानगी मागितली आहे.
राज्यातील सुमारे 11 हजार 155 ग्रंथालयांमध्ये कार्यरत 20 हजारांहून अधिक कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करत असल्याचा दावा निवेदनात केला आहे. कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करणे, ग्रंथालयांना मिळणाऱ्या 40 टक्के अनुदानात वाढ करणे, तसेच इतर मागण्यांसाठी यापूर्वी 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात आला होता.
मात्र, शासनाकडून अद्याप मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.