Solapur News: लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीत रुपांतर

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रक्रिया : नगरपंचायत करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
Solapur News
Solapur News: लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे होणार नगरपंचायतीत रुपांतर Pudhari
Published on
Updated on

पंढरपूर : लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यास नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे नगरपंचायतीची घोषणा निवडणुकीनंतर होणार आहे. यामुळे पंढरपूर शहराजवळ टाकळी ही एक नवीन नगरपंचायत निर्माण होणार आहे.

सध्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत आहे. या गावांमध्ये लोकसंख्या मोठया प्रमाणात असून चांगला विकास झाला आहे. यामुळे या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास नगर विकास विभागाने परवानगी दिली; मात्र सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामुळे नगरपंचायतीला परवानगी देऊ नये, याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर लक्ष्मी टाकळी नगरपंचायत म्हणून घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे या गावातील नागरिकांना विविध सुविधा मिळणार आहेत. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. पंढरपूर शहराजवळ आणखी एक नगरपंचायत निर्माण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news