Solapur Murder | लांबोटीत किरकोळ वादातून कामगाराचा खून; आरोपी फरार!

सिमेंट प्लेटा कारखान्यातील घटना; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू, आरोपी व मृत दोघेही बिहारी कामगार
Solapur Murder | लांबोटीत किरकोळ वादातून कामगाराचा खून; आरोपी फरार!
Pudhari News Network
Published on
Updated on

मोहोळ : सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील लांबोटी येथील रांगडा हॉटेलशेजारी असलेल्या सिमेंट प्लेटा तयार करणाऱ्या कारखान्यात भोजपूर (बिहार) येथील दोन कामगारांमध्ये सोमवारी सांयकाळी तू खुप काम करतोय का मी जास्त काम करतोय यामध्ये. पोटात लाथा बुक्याने झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाले. या घटनेत तुला कुमार याचा मृत्यू झाला असून, मारहाण करून पसार झालेला अनित महतो याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुला कुमार आणि अनित महतो यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अनित महतो याने केलेल्या मारहाणीत तुला कुमार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटातील आतडी तुतल्याने त्याच्यावर उपचार चालू असताना तो मयत झाला आज सकाळी माहिती मिळताच लांबोटी घटना स्थळी Dysp जगताप तसेच Pl नवनाथ पाटील यांनी पाहणी केली.

घटनेनंतर आरोपी अमित महतो घटनास्थळावरून फरार झाला. तो मूळचा बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यातील रामसहर येथील प्रबोध महतो असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती . लांबोटीचे पोलीस पाटील सर्जेराव पाटील यांनी पोलीसांना खबर दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनामुळे लांबोटी परिसरात खळबळ उडाली असून, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news