Maharashtra Mahila kesari: कुस्तीपटूंसाठी सात्विक आहाराची मेजवानी

खेळाडूंच्या प्रकृतीचा विचार करून अत्यंत सात्विक आहारावर भर देण्यात आला असून, सकाळी 8 वाजता नाश्ता, तर दुपारी 12 वाजल्यापासून भोजनाची सोय करण्यात आली
Maharashtra Mahila kesari
Maharashtra Mahila kesariPudhari
Published on
Updated on

सोलापुर: येथे आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून महिला कुस्तीपटू शनिवारी सकाळीच दाखल झाल्या. त्यांच्यासोबत मार्गदर्शक प्रशिक्षक आणि मोठा पालकवर्गही आला असून, या सर्वांच्या निवास व भोजनाची चोख व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. खेळाडूंच्या प्रकृतीचा विचार करून अत्यंत सात्विक आहारावर भर देण्यात आला असून, सकाळी 8 वाजता नाश्ता, तर दुपारी 12 वाजल्यापासून भोजनाची सोय करण्यात आली होती.

भोजन कक्षात शिस्त राखण्यासाठी पासची पद्धत लागू करण्यात आली. प्रवेशद्वारावर अधिकृत पास दाखवूनच खेळाडू व प्रशिक्षकांना भोजन दालनात प्रवेश दिला जात होता. मैदानावर ध्वनिक्षेपकावरून वारंवार एक महत्त्वाची सूचना दिली जात होती की, मिळालेला पास सर्वांनी अत्यंत जपून ठेवावा. कारण उद्यादेखील याच पासवर भोजन मिळणार असून, कोणालाही नवीन पास वितरित केले जाणार नाहीत. या कडक सूचनेमुळे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपले भोजन पास कुस्तीच्या डावपेचांइतकेच काळजीपूर्वक जपून ठेवल्याचे मैदानात पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news