Solapur Cyber Fraud : बनावट ॲपद्वारे साडेचौदा लाखांची फसवणूक

लिंकद्वारे ट्रेडिंगचे ऑनलाईन बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष दाखवून कुर्डुवाडी येथील एकाची १४ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on: 
Updated on: 

कुर्डुवाडी : लिंकद्वारे ट्रेडिंगचे ऑनलाईन बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष दाखवून कुर्डुवाडी येथील एकाची १४ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

सोहेल अल्लाउद्दीन तांबोळी ( रा. दास प्लॉट) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. फिर्यादीचे ज्यूस सेंटरचे दुकान आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांना एका ट्रेडिंग व्हाॅट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात आले. तांबोळी यांचे आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड बँक खात्याची माहिती मागवून प्राथमिक मार्केटिंग सदस्यत्व मंजूर करण्यात आले. नंतर तांबोळी यांना लिंक पाठवून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.

गृपमध्ये मेसेज करून तांबोळी यांना ५० हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. त्याप्रमाणे २४ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन, आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यावर सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम गुंतवणूक केली. मात्र, तांबोळी यांना पुढे परतावा मिळालाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news