Solapur Crime: कुंभारगावात जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर कारवाई

अठराशे रुपयांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

करमाळा : तालुक्यातील पश्चिम भागात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना कुंभारगाव येथे जुगार खेळताना अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोख 1,840 रकमेसह 2 लाख 2 हजार 840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद दहीहांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 26 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील बाळासाहेब देवराम आढाव यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली दीपक जालिंदर पोळ (वय 30), रामचंद्र पांडुरंग साळुंखे (37), शिवाजी आप्पा पोळ (59), रामदास भानुदास पानसरे (65), केशव दत्तू भोसले (65), रामदास पोपट पोळ (45), यमाजी पोपट सोनवणे (55), महादेव शिवराम पोळ (59), सत्यवान अजिनाथ भालेराव (40), नागेश पुंडलिक पोळ (30), ऋषिकेश रामदास कणसे (28, सर्व रा. कुंभारगाव, ता. करमाळा) हे 11 जण 52 पत्त्याच्या पानावर पैसे लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले आहेत.

या कारवाईत करमाळा पोलिसांनी 1,840 रुपये रोख रकमेसह विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 2 लाख 2 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पोलीस हवालदार सुहास पवार हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news