Solapur News : खेडभोसे पाटी ते आव्हे रस्त्यावर खड्डे बुजवणे काम रखडले

यापूर्वी थोडेफार बुजवलेले खड्डे आणखी खोल, काम पाच महिन्यांपासून थांबले; काम तत्काळ सुरू करण्याची मागणी
Solapur News
खेडभोसे पाटी ते आव्हे रस्त्यावर खड्डे बुजवणे काम रखडले
Published on
Updated on

भोसे : खेडभोसे पाटी ते आव्हे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. प्रवाशांच्या तक्रारीनंतर बांधकाम विभागाकडून दिवाळीच्या दरम्यान हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र जेमतेम 3 कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजवल्यानंतर ठेकेदार गायब झाला आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून हे काम रखडले आहे.

खेडभोसे पाटी ते आव्हे (प्रजिमा 166) हा सुमारे 18 किमी लांबीचा रस्ता आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनवण्यात आलेल्या या रस्त्याचा दर्जाही खूप चांगला होता. त्यानंतर हा रस्ता पीएमजीएसवाय कडून सार्वजनिक बांधकाम विभाग, करकंब यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मागील 3 वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जेमतेम 3 कि.मी.वरील होळकर वस्ती पर्यंत खड्डे कसेबसे बुजवले आहेत. तिथून पुढचे काम मागील पाच महिन्यांपासून रखडले आहे. होळकर वस्तीपासून खेडभोसे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली खडी सुद्धा ठेकेदाराच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या कडेला तशीच पडली आहे. तर अनेक ठिकाणची खडी ‌‘गायब‌’ झाली आहे.

मात्र, सततच्या वर्दळीमुळे आणि खड्डे बुजवताना काटकसर केल्यामुळे यापूर्वी बुजवलेल्या खड्ड्यातील खडी निघून गेली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी केलेला खर्च हा खड्ड्यात गेल्याचे बोलले जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news