Solapur Kharif Season: खरीप हंगामात तूर, मूग, उडीद बियाणे संच मिळणार

अनुदानावर बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर करावा लागणार अर्ज
Solapur Kharif Season: खरीप हंगामात तूर, मूग, उडीद बियाणे संच मिळणार
Published on
Updated on

सोलापूर : खरीप हंगाम २०२६ अंतर्गत शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बियाणे संच (सीड किट) उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केला आहे.

‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांचे ४ किलो वजनाचे बियाणे आणि जैविक खताची पाकिटे पाच वर्षांच्या आतील वाणांसाठी वितरीत केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’चा वापर करून महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड होईल. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. यामुळे ३० टक्के महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक, मंडळ किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news