Solapur hostel student death| कामती बुद्रुक येथील वस्तीगृहातील खोलीत विद्यार्थिनीने जीवन संपवले

मूळ गाव गोटेवाडी येथून परतल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे
Solapur hostel student deat
Solapur hostel student deat
Published on
Updated on

कामती : मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे एका वस्तीगृहात राहणाऱ्या अठरा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही दुर्दैवी शुक्रवारी (दि.२३ जानेवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कु. स्नेहल प्रदीप धरगुडे (वय १८, रा. गोटेवाडी, ता. मोहोळ) असे जीवन संपवलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कु. स्नेहल धरगुडे ही कामती बुद्रुक येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या राधाकृष्ण गुरुकुल वस्तीगृहात वास्तव्यास होती. ती इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. दोन-तीन दिवसांपूर्वी ती आपल्या मूळ गावी गोटेवाडी येथे गेली होती. त्यानंतर ती पुन्हा वस्तीगृहात परतली होती.

शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिने वस्तीगृहातील खोलीत गळफास घेऊन जीवन संपवल्याचे लक्षात येताच तिला तातडीने सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news