Solapur Storm Damage: जातेगावात वादळी वाऱ्यामुळे साडेचार लाखांचे नुकसान

जातेगाव येथील ईश्वर रामराव शिंदे यांच्या कोंबड्याच्या पोल्ट्री फार्मवरील सुमारे 50 पत्रे उडून गेले
Solapur Storm Damage: जातेगावात वादळी वाऱ्यामुळे साडेचार लाखांचे नुकसान
Published on
Updated on

करमाळा : सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळ वाऱ्याने अनेक घरावरील तसेच पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्याने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

जातेगाव येथील ईश्वर रामराव शिंदे यांच्या कोंबड्याच्या पोल्ट्री फार्मवरील सुमारे 50 पत्रे उडून गेले. सुमारे एक लाखाचे नुकसान झालेे आहे यावेळी पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या नसल्याने मोठी नुकसान टळले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी विजेचे पोल वाऱ्याने मोडून पडले आहेत. ईश्वर शिंदे यांच्या दीड एकर केळी मोठ्या प्रमाणात पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे आहे.

राजेंद्र विश्वनाथ गाढवे यांच्या घरावरील 23 पत्रे उडून गेले आहेत, तर त्यांच्या विटाच्या बांधकामाचे भिंती पडल्या आहेत. याबरोबरच गोठ्यावरील नऊ पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी झालेल्या पावसाने घरातील साडेतीन क्विंटल ज्वारी भिजून नुकसान झाले आहे. भाऊसाहेब ज्ञानदेव गाढवे यांच्या शौचालयावरील तसेच बाथरूम वरील पत्रे उडून गेले आहेत. तलाठी नीलेश मुरकुटे यांनी पंचनामा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news