Solapur IT Park: आयटी पार्कच्या जागेचा मार्ग मोकळा

होटगीची पन्नास एकर जागा विनामोबदला
Solapur IT Park: आयटी पार्कच्या जागेचा मार्ग मोकळा
Published on
Updated on

सोलापूर : नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार आहे. त्यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार होता. आता जागा विनामोबदला मिळणार असल्याने साडेतीन कोटी रुपये वाचणार आहे.

सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती देणारा हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लघु पाटबंधारे तलावाच्या गट क्रमांक ५७६ मधील सुमारे २० हेक्टर (५० एकर) जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे विनामोबदला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आयटी पार्क उभारण्याच्या जागेवरुन वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिटणे येथे गेल्या सहा महिन्यांपूर्वी सोलापुरात घेतलेल्या कार्यक्रमात आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने होटगी येथील जलसंपदा विभागाचे ५० जागेचा प्रस्ताव पाठविला.

पूर्वी २०२१-२२ मध्ये ही जागा लॉजिस्टिक पार्कसाठी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, सोलापूरमधील तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉजिस्टिक पार्कचा आधीचा ठराव रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या जागेची पाहणी केली आणि ती अंतिम केली.

सुरुवातीला या भूसंपादनासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये मोजावे लागणार होते, परंतु शासनाने ही जमीन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. २२ जुलै २०२६ रोजी पाटबंधारे विभागाने एमआयडीसी सोलापूरला अधिकृत पत्र पाठवून नियामक मंडळाच्या या मंजुरीची माहिती दिली असून पुढील प्रशासकीय कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूरची अर्थव्यवस्था मजबूत होऊन हॉटेल, रिअल इस्टेट आणि वाहतूक क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. हा प्रकल्प सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचे नवे आयटी डेस्टिनेशन बनवण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news