Solapur IT Park: आचारसंहिता संपताच आयटी पार्कचे भूमिपूजन

नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होत असून, त्यासाठी उच्चस्तरीय समितीनेही मंजुरी दिली आहे
Solapur IT park |
Solapur IT park:File Photo
Published on
Updated on

सोलापूर : नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होत असून, त्यासाठी उच्चस्तरीय समितीनेही मंजुरी दिली आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आचारसंहिता संपताच नोटिफिकेशन जारी होऊन भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

होटगी येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर सूमारे 40 कोटी रुपये खर्च करून येत्या 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होऊन आयटी पार्कसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी सोलापुरात आयटी पार्कसाठी जागेचा शोध घ्या, त्यास मंजुरी देऊ अशा सूचना दिल्या होत्या. त्यानूसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होटगी रोडवरील जलसंपदा विभागाचा प्रस्ताव तयार केला.

या जागेस औद्योगिक विकास महामंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. डिसेंबर महिन्यांत भूमिपूजन करण्याची तयारी सुरु करण्यात आली. परंतू महापालिका निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने आचारसंहिता लागू झाली. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे 7 फेबु्रवारी रोजी आचारसंहिता संपल्यानंतर आयटी पार्कचे भूमिपूजन होणार आहे.

होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करुन मंजूरी देण्यात आली आहे. जागेसाठी सूमारे साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला एमआयडीसी विभागाकडून दिले जाणार आहे. अतंर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी मुलभूत सुविधांसाठी सूमारे 37 ते 38 कोटी रुपये लागणार आहे.

भाजपने पूर्णत्वाचे वचन दिले होते

महापालिका निवडणुकीत भाजपाला 87 जागेवर घवघवीत यश मिळाला आहे. भाजपाने महापालिकेर सत्ता आल्यास आयटी पार्क पूर्णत्वाचे वचन दिले होते. त्यामुळे आता भाजपाने पहिले काम आता आयटी पार्कचा शुभारंभ करण्याची तयारी सुरु केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news