

सोलापूर : गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 12 लाखांची फसवणूक कर्नाटकातील एकाने केली आहे. याप्रकरणी राघवेंद्र विजयकुमार ज्योती (वय 48, रा. साखर पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून माधव येदुनाथ जोशी (रा. गलगली, ता. बेळगी, जि. बागलकोट) याच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
15 फेब्रुवारी 2021 ते 16 मार्च 2025 या काळात ही फसवणूक झाली. राघवेंद्र यांना माधव याने धारवाड येथील आयटीआय कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळवून देतो, असे सांगतिले. तसेच केंद्राकडून 10 कोटींचे अनुदान मिळेल, नव्या ट्रस्टमध्ये राघवेंद्र यांना संचालक मंडळात स्थान देऊ, यासाठी 1 कोटीची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्याबदल्यात दीड कोटीचा परतावा मिळवून देण्याचे आमिषही दाखविले. त्यामुळे राघवेंद्र व त्यांच्या पत्नीने संशयिताला 48 लाख तर अनुप माळवदकर यांनी 64 लाख रुपये दिले. मात्र, परतावा दिला नाही.