Solapur News | सोलापुरात 28 बेकायदा बांधकामांवर लवकर हातोडा

महापालिका आयुक्तांचा इशारा; चार दिवसांत यादी जाहीर होणार
Solapur News |
Solapur News | सोलापुरात 28 बेकायदा बांधकामांवर लवकर हातोडाFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : शहारातील बेकायदा बांधकाम प्रकरणातील 96 प्रकरणांवर गेल्या दोन दिवसांत पुन्हा सुनावणी झाली. उर्वरित 36 प्रकरणाची सुनावणी दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. सुुनावणी झालेल्या प्रकरणामध्ये 28 बांधकामे पाडण्याशिवाय पर्याय नाही, हे सिद्ध झाले आहे. यासर्व 28 बेकायदा इमारतीवर लवकरच हातोडा घाताला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.

शहरातील बेकायदा 96 मिळकतदारांना महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत. या मिळकतदारांनी बांधकामांमध्ये सामासिक अंतराचे उल्लंघन केले आहे. बोगस बांधकाम परवाने घेणार्‍या परवानाधारक इंजिनिअर्सनी चार अभियंत्यांमार्फत ऑफलाइन परवाने घेण्याची बनावटगिरी केली आहे. ही बांधकामे नियमित केल्यास पुन्हा बोगस परवाने आणि बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळू शकते. या कारणास्तव ही बांधकामे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नोटिसा दिलेले पाच बेकायदा बांधकामे मिळकतदार स्वतःहून पाडून घेत आहेत. दोन दिवसात शिल्लक 35 प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्व बांधकामांवर महापालिकेचा हातोडा पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news