

सोलापूर : शहरातील बेकायदा बांधकाम प्रकरणातील 96 प्रकरणांवर गेल्या दोन दिवसांत पुन्हा सुनावणी झाली. या बेकायदा बांधकामाची यादी महापालिकेकडून जाहीर केली आहे. शहरातील अनेक नामंवत बिल्डर, प्रतिष्ठीत नागरिकांनी बांधकाम नियमाचे उल्लंघन करत बांधकामे केली आहे. नोटीसा देऊन ही पाडकाम केले नाही त्यामुुळे आता महापालिका आयुुक्तांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात 96 बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. यासर्व प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली झाली आहे. सुनावणी झालेल्या प्रकरणामध्ये 28 बांधकामे पाडण्याशिवाय पर्याय नाही, हे सिद्ध झाले आहे. त्या शिवाय शहरातील बेकायदा 96 बेकायदा बांधकामे पाच्छा पेठ गणेश पेठ,मजरेवाडी लक्ष्मी पेठ, उत्तर कसबा, भवानी पेठ, साखरपेठ, नेहरूनगर शुक्रवार पेठ, विजापूर रोड, सलगरवाडी, रेल्वे लाईन, उत्तर कसबा, पूर्व मंगळवार पेठ, जोडभावी पेठ, कसबा, दक्षिण सदर बाझार , तेलंगी पाच्छा पेठ, सिद्धेश्वर पेठ, उत्तर कसबा बेगमपेठ भागातील आहेत. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक,नामवंत बिल्डर, राजकारणी आणि समाजकारणी लोकांचा समावेश आहे.
उत्तर कसबा येथील प्रशांत भीमाशंकर दर्गो पाटील, पाच्छा पेठेतील शहाणे बिल्डर, उत्तर सदर बाजार परिसरातील आदर्श सहकारी बिल्डिंग, रेल्वे लाईन परिसरातील दर्शना कंट्रक्शन, राजेश चंद्रकांत शहा, सिव्हिल लाईन परिसरातील गुरुनानक सिंधि को. हाऊसिंग सोसायटी मोहन सचदेव, नेहरूनगर येथील निशा प्रकाश भोसले, उत्तर कसबातील साई विश्व बिल्डर्स भागीदार लक्ष्मीनारायण दुस्सा, सिद्धेश्वर पेठेतील स्क्वेअर इन बिल्डिंग अँड डेव्हलपर्स, पाच्छा पेठेतील स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, उत्तर, कसबा मधिल कल्पना नितीन आपटे रूपाली विजय आपटे उत्तर कसबेतील मल्लिनाथ विश्वास दर्गो पाटील, गजराज नगर येथील स्क्वेअर बिल्डर आणि डेव्हलपर्स नासिर खलिफा यांच्या सह अनेकांचा समावेश आहे. या सर्वांना मिळकतदारांना महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत. या मिळकतदारांनी बांधकामांमध्ये सामासिक अंतराचे उल्लंघन केले आहे.
बोगस बांधकाम परवाने घेणार्या परवानाधारक इंजिनिअर्सनी चार अभियंत्यांमार्फत ऑफलाइन परवाने घेण्याची बनावटगिरी केली आहे. ही बांधकामे नियमित केल्यास पुन्हा बोगस परवाने आणि बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळू शकते. या कारणास्तव महापालिकेच्या वतीने बेकायदा बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. आता आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.