HSC result: बारावी परीक्षेत मुलींचीच बाजी

सोलापूर जिल्ह्याचा निकाल 87.22 टक्के; पुणे विभागात तिसऱ्या स्थानी
HSC result
HSC result
Published on
Updated on

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकालात सोलापूर जिल्ह्याचा 87.22 टक्के निकाल लागला असून, यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मात्र, पुणे विभागीय निकालात सोलापूर तिसऱ्यास्थानी राहिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 727 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 52 हजार 990 विद्यार्थी परीक्षा दिली. यातील 46 हजार 221 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्याचा निकाल 93.32 टक्के तर अहमदनगरचा निकाल 90.32 टक्के तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा 87.22 टक्के लागला आहे.

यंदाच्या परीक्षेत 29 हजार 595 मुले नोंदणी केली होती. यात 29 हजार 165 जणांनी परीक्षा दिली. 23 हजार 978 मुले उत्तीर्ण झाले. मुले उत्तीर्णतेचे प्रमाण 82.21 टक्के इतकी आहे. तर 24 हजार 132 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 23 हजार 825 मुलींनी परीक्षा दिली. 22 हजार 243 मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाचे प्रमाण हे 93.35 टक्के इतका आहे. या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

विज्ञान शाखेचा निकाल हा 95.52 टक्के लागला असून, त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ही 83.66 टक्के, कला शाखेचा निकाल 72.85 टक्के इतका लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news