Solapur Crime: घरफोडी, मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघड; ५.२६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दोन महिलांसह एकजण ताब्यात
Solapur Crime: घरफोडी, मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघड; ५.२६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Published on
Updated on

सोलापूर : एमआयडीसी पोलिसांनी शहरातील सोन्याचे दागिने व मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करून ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत दोन महिलांसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी अधिक माहिती दिली.

स्‍वप्निल पुंडलिक सिदम (रा. क्षिरलिंग नगर, एमआयडीसी, सोलापूर) यांच्‍या घरातून ३५ ग्रॅम सोन्‍याचा चपलाहार चोरीस गेला होता. तसेच वासंती मल्‍लिनाथ नेलुरे (रा. विठ्ठल नगर, अक्कलकोट रोड) यांच्‍या घरातून १५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. भरत रमेश भोई यांचा मोबाईल व लक्ष्मण शिवण्णा पुजारी यांचा मोबाईल एकाच दिवशी चोरीस गेला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे व. पोलिस निरीक्षक बी.एस.बिराजदार यांनी या चोरीच्‍या घटना उघडकीस आणण्याबाबत गुन्‍हे शाखेचे पोउनि अल्‍फाज शेख यांना सूचना केल्या होत्‍या. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित दोन महिलांची कसोशीने चौकशी केली. त्यांच्या ताब्यातून ५० ग्रॅम वजनाचे सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत झाले.

तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश किसन बोधीवाले (रा. लोधी गल्ली, आर.के. हॉस्पिटलजवळ) याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याच्याकडून २६ हजार ६८४ रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले असून, ५ लाख २६ हजार ६८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहा. पोलिस आयुक्त अरुण देवकर, वपोनि बी. एस. बिराजदार, पोनि संगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अल्‍फाज शेख, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, सचिनकुमार लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, अजित माने, नागेशसिंह चव्‍हाण, कुमार बोल्‍ली, सकलेन मुकादम, अविनाश डिगोळे, अमोल खरटमल, नागमणी म्‍हेत्रे यांनी पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news